Wednesday, 18 May 2016

ही अनादि भरतभू ही अनादि संस्कृती

ही अनादि भरतभू ही अनादि संस्कृती
रोज अरुण चंद्र्मा आरतीस उगवती॥
धरुनि अभय सावली मायभूमिच्या शिरी
हायुगे युगे उभा अचलराज हिमगिरी
चरणि अर्घ्य द्यावया सिंधुलहरी उसळती॥१॥
शब्द स्वप्निही दिला तरिही तो ठरो खरा
म्हणुनि राव रंक हो ही इथे परंपरा
पितृवचन पाळण्या विजनवासि रघुपती॥२॥
धर्मराज तो तया भीम पार्थ वंदिती
देव सूत हिऊनी कर्मयोग सांगती
ज्ञानियामुखे इथे बोलते सरस्वती॥३॥
याच भूवरी जिजा शिवनॄपास वाढवी
श्रीसमर्थवैखरि राष्ट्रधर्म जागवी
नीति नांदते इथे सिध्द शक्ति संगती॥४॥
ह्रदय आमुच्या सदा मंत्र शांतिचा वसे
सुष्ट मानवासवे वैर आमुचे असे
अंतरात अस्मिता ही सदैव जागती॥५॥